जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रम
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज सर्वश्री कॉन्व्हेंट अँड ज्युनियर कॉलेज, दिघोरी, नागपूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लीलाताई हाथीबेड उपमहापौर, नागपूर महानगरपालिका यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच संस्थेच्या ऐश्वर्या मॅडम, मासुरकर सर, मासुरकर मॅडम तसेच इतर सर्व शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात राहुल नंदनवार यांच्या टीमने विविध सांस्कृतिक उपक्रम सादर करून महिलांच्या जीवनात आनंदाचा आणि विरंगुळ्याचा सुंदर क्षण निर्माण करण्याचे कार्य केले. यासोबतच आपला माणूस फाउंडेशन, नागपूर चे डॉ. अॅड. गगन उर्फ राहुल राधाकेशव रहांगडाले (सचिव) व त्यांच्या टीमचे सर्व पदाधिकारी देखील उपस्थित होते.
एकंदरीत कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला. उपस्थित सर्वांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
— डॉ. अॅड. गगन उर्फ राहुल राधाकेशव रहांगडाले
सचिव, आपला माणूस फाउंडेशन, नागपूर















