आपला माणूस फाउंडेशन

आपला माणूस फाउंडेशन अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

डॉ. गगन केशव रहांगडाले यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आपला माणूस फाउंडेशनची स्थापना सन २०२६ मध्ये करण्यात आली. समाजातील विविध परोपकारी व समाजोपयोगी उपक्रमांना एक व्यापक, संघटित व प्रभावी दिशा देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक, शाश्वत आणि प्रेरणादायी बदल घडवणे, हीच फाउंडेशनची मूल्याधिष्ठित भूमिका असून “समाजासाठी, माणुसकीसाठी” हे ब्रीदवाक्य केंद्रस्थानी ठेवून संस्था कार्यरत आहे.

आपला माणूस फाऊंडेशन, नागपूर ही एक निःस्वार्थ सामाजिक संस्था असून समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. ग्रामीण परिवर्तन, आरोग्य सेवा, शिक्षण, क्रीडा विकास, महिला सक्षमीकरण, आपत्ती व्यवस्थापन, तसेच कला, संस्कृती व वारसा संवर्धन या विविध क्षेत्रांमध्ये संस्था सातत्याने कार्य करत आहे.

संस्था केवळ मदतकार्यापुरती मर्यादित न राहता, समाजाला स्वावलंबी, सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने दीर्घकालीन परिणामकारक उपक्रम राबवते

संस्थेची प्रमुख उद्दिष्ठे
संचालक मंडळ आणि सदस्य