साई बाबा (शिर्डी) दर्शन सोहळा

आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता माझ्या निवासस्थानी
साई बाबा शिर्डीचे यांच्या पावन श्री साईनाथ महाराजांच्या चरण पादुकांचे दर्शन सोहळा, भजन संध्या व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
समस्त वस्तीतल्या नागरिकांनी पालखी सोहळ्याचा मनापासून आनंद घेतला. तसेच भजन संध्याच्या कार्यक्रमात आमचे मित्र राहुल नंदनवार यांच्या समूहाने अतिशय सुंदर व भक्तिमय भजने सादर करून वातावरण भक्तिरसाने भारावून टाकले. साई बाबांची आकर्षक प्रतिकृती साकारून सहभागी झालेल्या मित्रांचेही मनःपूर्वक आभार.
संपूर्ण कार्यक्रम सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी मोलाचा हातभार लावला. यामध्ये विशेषतः
आपला माणूस फाउंडेशन, नागपूर चे सर्व पदाधिकारी, अवधूत नगर येथील नागरिक, मित्र मंडळ, महिला मंडळ, स्पेशल बँड पथक तसेच श्री साई चरण पादुकांचे नियोजन करणारे आमचे मार्गदर्शक गुरुजी श्री धनंजय जोशी यांचे विशेष आभार.
कार्यक्रमाला वार्ड क्र. ३४ च्या नगरसेविका सौ. मनीषा ताई नगरधनकर व सौ. मंगला ताई खेकरे या आवर्जून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्वादिष्ट महाप्रसादाचा लाभ घेतला.
तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओम भाऊ झाडे, दुधे काकाजी, मस्कर काकाजी, कुंडलकर काकाजी, पवन तांबेकऱ, अविनाश पांढुरकर, आशीष आमलीकवार, लक्ष्मण झाडे, विकास दुधे, सुनील चौधरी, कमलाकर कुमारे, विजय रामगीरकर, राहुल नंदनवार व भूषण बोरकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.