इंटरस्कूल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

दि. २८ फेब्रुवारी व ०१ मार्च २०२६ रोजी आपला माणूस फाउंडेशन नागपूर तर्फे भव्य इंटरस्कूल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत नागपूर शहरातील स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड, नागपूर महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच विविध खासगी संस्थांमधील एकूण १६ शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक (कोच), पंच (अंपायर्स), मैदान व्यवस्थापन करणारे मित्रमंडळ व सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
स्पर्धेमध्ये आदर्श संस्कार विद्यालय पिपळा फाटा यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
द्वितीय क्रमांक विद्यानिकेतन स्कूल वर्धमान नगर यांनी मिळविला, तर तृतीय क्रमांक शाहू गार्डन स्कूल शाहू नगर यांनी प्राप्त केला.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच
🥇 प्रथम पारितोषिक – ₹२१,००० रोख + ट्रॉफी
🥈 द्वितीय पारितोषिक – ₹११,००० रोख + ट्रॉफी
🥉 तृतीय पारितोषिक – ₹५,००० रोख + ट्रॉफी
यासोबतच बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज आणि प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच अशी विशेष पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी उत्तम नाश्ता व पाण्याची सोय करण्यात आली होती.
स्पर्धेचे उद्घाटन लीला ताई हत्तीबेड, उपमहापौर नागपूर महानगरपालिका, तसेच नागेश भाऊ मानकर (नगरसेवक, प्रभाग क्र. ३४) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सोबतच मनीषा ताई नगरधनकर (नगरसेविका, प्रभाग क्र. ३४) यांनी विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करून आपली उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. अॅड. गगन रहांगडाले, संस्थापक सचिव यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
धन्यवाद!