आपला माणूस फाउंडेशन | महिला सक्षमीकरण
महिला सक्षमीकरण
महिलांना सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर जीवन जगता यावे, हा महिला सक्षमीकरण उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. समाजातील महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करून त्यांना कौशल्य, रोजगार व नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेमार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात येतात.
उपक्रमांतर्गत सुविधा :
- कौशल्य विकास व व्यवसाय प्रशिक्षण (शिलाईकाम, ब्युटी पार्लर, हस्तकला इ.)
- स्वयंरोजगार व लघुउद्योगासाठी मार्गदर्शन
- बचत गट (Self Help Group) स्थापना व आर्थिक साक्षरता
- आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिरे
- कायदेविषयक हक्क व सुरक्षा विषयक मार्गदर्शन
- व्यक्तिमत्व विकास व नेतृत्व प्रशिक्षण
- डिजिटल साक्षरता व संगणक शिक्षण
- गरजू महिलांना आर्थिक व समुपदेशन सहाय्य
या उपक्रमाद्वारे महिलांना आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वावलंबनाची ताकद देऊन समाजाच्या प्रगतीत त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जातो.
