आपला माणूस फाउंडेशन | ज्येष्ठ नागरिक सहाय्य
ज्येष्ठ नागरिक सहाय्य
समाजातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने, सुरक्षित आणि निरोगी जीवन जगता यावे, तसेच त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक सहाय्य उपक्रम राबविण्यात येतो. वृद्धांना मानसिक आधार, आरोग्य सेवा आणि सामाजिक सहकार्य देऊन त्यांना एकाकीपणातून बाहेर काढणे व आनंदी जीवन जगण्यासाठी मदत करणे हे या उपक्रमाचे मुख्य ध्येय आहे.
उपक्रमांतर्गत सुविधा :
- मोफत आरोग्य तपासणी व वैद्यकीय शिबिरे
- औषधे व उपचारांसाठी आर्थिक सहाय्य
- अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
- निवारा व दैनंदिन गरजांसाठी मदत
- समुपदेशन व मानसिक आधार सेवा
- विरंगुळा, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
- सरकारी योजना व हक्कांविषयी मार्गदर्शन
- एकाकी व गरजू वृद्धांसाठी विशेष मदत व भेटी
या उपक्रमाद्वारे ज्येष्ठ नागरिकांना प्रेम, सन्मान आणि सुरक्षिततेची भावना देऊन त्यांचे जीवन अधिक सुखकर व समाधानकारक बनविण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जातो.
