आपला माणूस फाउंडेशन | कार्यक्रम व उपक्रम
कार्यक्रम व उपक्रम
संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व जनजागृतीपर विविध कार्यक्रम व उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतात. गरजू, अनाथ, महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि समाजात सकारात्मक बदल घडविणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.
प्रमुख कार्यक्रम व उपक्रम :
- अनाथ व गरजू बालकांना शैक्षणिक व आर्थिक सहाय्य
- विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, पुस्तके व शालेय साहित्य वाटप
- महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास प्रशिक्षण
- ज्येष्ठ नागरिक सहाय्य व आरोग्य सेवा
- मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरे
- आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत व पुनर्वसन कार्य
- अन्नदान, वस्त्रदान व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
- पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण व स्वच्छता अभियान
- सामाजिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन
- शासन योजना व हक्कांविषयी जनजागृती
या सर्व उपक्रमांद्वारे समाजात सेवा, सहकार्य व मानवतेची भावना जोपासून सर्वांच्या प्रगतीसाठी सातत्यपूर्ण कार्य केले जाते.
