आपला माणूस फाउंडेशन | कला, संस्कृती व वारसा
कला, संस्कृती व वारसा
समाजातील कला, संस्कृती व परंपरांचा जतन, संवर्धन व प्रसार करणे तसेच नवीन पिढीला आपल्या समृद्ध वारशाची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत सांस्कृतिक मूल्यांची जपणूक आणि सामाजिक एकात्मता वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
उपक्रमांतर्गत सुविधा :
- पारंपरिक कला, लोककला व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
- नृत्य, संगीत, नाटक व साहित्यिक स्पर्धा
- स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन व सन्मान
- ऐतिहासिक वारसा व स्मारकांविषयी जनजागृती
- सण-उत्सव, जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमांचे आयोजन
- बालक व युवकांसाठी कला प्रशिक्षण व कार्यशाळा
- लोकपरंपरा, संस्कार व सामाजिक मूल्यांचा प्रचार
- सांस्कृतिक एकात्मता व बंधुभाव वाढविणारे उपक्रम
या माध्यमातून आपल्या कला, संस्कृती व वारशाचे जतन करून पुढील पिढीसाठी समृद्ध सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जातो.
